Aryan Khan Case: शाहरुखची मॅनेजर चौकशी टाळतेय मुंबई पोलीस उचलणार मोठं पाऊल

0
22

हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़े

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीशी संबंधित खंडणी प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत. याप्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी हिला समन्स बजावले आहे. मात्र, बुधवारीही ती जबाब नोंदवण्यासाठी आली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई पोलीस पुढचं पाऊल उचलतील अशी शक्यता आहे. ( Mumbai Cruise Party Extortion Case )

कॉर्डेलिया क्रूझवर टाकलेल्या छाप्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. आर्यन हा सध्या जामिनावर सुटला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने या कारवाईबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. हे डील १८ कोटीला फायनल करण्यात आले. त्यात किरण गोसावी, सॅम डिसूझा हे सामील होते. या रकमेतील ८ कोटी रुपये एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना दिले जाणार होते.

Aryan Khan Case: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप असून मुंबई पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

Pooja Dadlani

कॉर्डेलिया क्रूझवर टाकलेल्या छाप्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. आर्यन हा सध्या जामिनावर सुटला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने या कारवाईबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. हे डील १८ कोटीला फायनल करण्यात आले. त्यात किरण गोसावी, सॅम डिसूझा हे सामील होते. या रकमेतील ८ कोटी रुपये एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना दिले जाणार होते. डील फायनल झाल्यावर टोकन रक्कम म्हणून पूजा ददलानीने ५० लाख रुपये दिले होते, असा साईल याचा दावा आहे. तसे प्रतिज्ञापत्र त्याने दिले आहे. याच आरोपाच्या आधारे तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांची एसआयटी स्थापन करण्यात आली असून एसआयटीने आतापर्यंत साईल, अन्य एक साक्षीदार विजय पगारे याच्यासह संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. एसआयटीने शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीला याच प्रकरणात समन्स बजावले होते. मात्र, तब्येतीचे कारण देत ती जबाब नोंदवण्यास हजर झाली नाही.

Facebook Comments Box