नाशिक – 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र त्या पोलिसांना चकमा देऊन वैशाली पसार झाल्या होत्या दरम्यान ठाणे ACB धडाकेबाज कारवाई करत शिक्षणाधिकारी वैशाली यांना अटक केली आहे. ही कामगिरी ठाणे अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या टीमने केली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर-वीर सद्ध्या पोलिसांच्या ताब्यात असून ठाणे ACBने त्यांना अटक केली आहे.
वैशाली यांना आज न्यायालयात हजर करणार आहे. अटकपूर्व जामिनासाठी डॉ. वैशाली यांनी दाखल केलेल्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच ठाणे ACB नं त्यांना ताब्यात घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून वैशाली यांचा शोध सुरु होता. अधिकारी पल्लवी ढगे यांनी त्यांना अटक केली आहे.
Facebook Comments Box