नगरसेवक सीताराम सुरे, शिवसेना शाखाप्रमुख नितीन कळसकर, शिवसेना शाखाप्रमुख रमेश सुर्यवंशी यांनी आमदार मा.श्री.प्रदिपजी जैस्वाल साहेब यांना संपर्क साधून माहिती दिली आमदार जैस्वाल साहेब यांनी लगेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री भगत साहेब यांना तात्काळ पहाणी करून पर्यायी पुल तयार करून देण्याची सुचना दिली.श्री.भगत साहेब यांनी सोमवार दिनांक ४/१०/२०२१ रोजी पहाणी करून आज बुधवार दिनांक ६/१०/२०२१ रोजी पर्यायी पुलाचे काम सुरू केले पर्यायी पुलाचे काम सुरू असताना युवा सेना काॅलेज कक्षाधिकारी श्री.ऋषिकेष प्रदिप जैस्वाल यांनी भेट देऊन पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री शेजूळ साहेब यांना पुलाच्या कामासाठी स्वतः लक्ष ठेवून काम चांगल्या पद्धतीने करण्याच्या सुचना दिली. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख रमेश सुर्यवंशी, नितीन कळसकर, युवा सेना उपशहराधिकारी किरण सुरे, गोविंद जैस्वाल आदी उपस्थित होते
आंबेडकर चौक ते पिसादेवी या रस्त्यावरिल पावसाने आरतीनगर येथील पुल वाहून गेला त्या संदर्भात .
Facebook Comments Box