Anti Corruption Pune | लाचखोर सहायक पोलिस निरीक्षकासह त्याच्या साथीदाराला 5 दिवसांची पोलिस कोठडी

0
29

हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़े

Anti Corruption Pune | लाचखोर सहायक पोलिस निरीक्षकासह त्याच्या साथीदाराला 5 दिवसांची पोलिस कोठडी

Anti Corruption Pune | फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनासाठी मदत करण्यासाठी एकाकडून एक लाख रुपयांची लाच (Anti Corruption Pune) घेणाऱ्या विमानतळ पोलिस ठाण्यातील (Vimannagar Police) सहायक पोलिस निरीक्षकासह त्याच्या साथीदाराला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जामीन मिळवून देण्यासाठी पोलिसाने एकूण पाच लाखांची मागणी केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Pune) बुधवारी ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील API Rahul Ashok Patil (वय ३२, रा. वडगाव शिंदे रस्ता) आणि संतोष भाऊराव खांदवे Santosh Bhaurao Khandve (वय ४६, रा. लोहगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या वडिलांचा जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यावसायिक कारणातून त्यांच्या वडिलांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या वडिलांना अटक झाली असून ते पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी तक्रारदार यांनी पाटील यांच्याशी संपर्क केला होता.

जामिनाला विरोध न करण्यासाठी आणि अनुकूल अभिप्रायासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती.

तडजोडीत तक्रारदाराने तीन लाखांची लाच देण्याचे मान्य केले.
लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाखांची मागणी करण्यात आली होती.
पाटील यांनी त्यांचा ओळखीचे खांदवे याला तक्रारदाराकडून लाच घेण्यासाठी बुधवारी लोहगाव परिसरात पाठविले.
दरम्यान, या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून खांदवेला एक लाखांची लाच घेताना पकडले.

Facebook Comments Box